चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी- हंड्याकुंड्या- पाटी रस्त्यावर गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली असून सागवान लाकडासह दोन लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव : जिल्ह्यातील वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी- हंड्याकुंड्या- पाटी रस्त्यावर गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली असून सागवान लाकडासह दोन लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लाकूड तस्करांचा शोध घेतला जात असल्याचे चोपडा येथील सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांनी सांगितले.