अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

पुणे येथे झालेल्या राज्य पातळीवरील कार्यक्रमांमध्ये अक्षता जाधव हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक यामध्ये मोठा करंडक व सन्मानपत्र देण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता राजेंद्र जाधव ही विद्यार्थीनी अबॅकस परीक्षेमध्ये महाराष्ट्रात दुसरी आली आहे. विशेष म्हणजे तिने हे सर्व शिक्षण ऑनलाईन घेतल्या असताना देखील ग्रामीण भागातील या विद्यार्थिनीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.

आयडियल प्ले अबॅकस इंडिया या शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित असणाऱ्या संस्थेच्या वतीने येथे अठरावी राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुणे नगर सोलापूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर सांगली यासह अनेक जिल्ह्यामधून तब्बल 3000 पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील कोटा मेंटॉस या शाळेमधील विद्यार्थिनी अक्षता जाधव हिने या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमट वला. व नेत्र दीपक कामगिरी करताना राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. अतिशय थोडक्यामध्ये तिचा पूर्ण क्रमांक मिळवण्याची संधी हुकली. तिच्या या यशाबद्दल आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या वतीने शाळेचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबे, प्राचार्य रीक्की गुप्ता, विशाल केदळकर व शाळेतील सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

पुणे येथे झालेल्या राज्य पातळीवरील कार्यक्रमांमध्ये अक्षता जाधव हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक यामध्ये मोठा करंडक व सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी तिच्या मार्गदर्शक शिक्षिका संध्याकाळी व दिपाली वसगढेकर या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना केशव आजबे म्हणाले की, कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये अक्षता जाधव येणे आज एक नवा इतिहास लिहिला आहे. अतिशय चांगले यश या परीक्षेमध्ये तिने मिळवले आहे. या परीक्षेची काठीण्य पातळी मोठी आहे व हजारो विद्यार्थ्यांमधून दुसरा क्रमांक मिळवणे ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कोटा मेंटॉर्स शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सह इतर स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करून घेत असल्यामुळे इतर परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मोठे यश मिळत आहेत.