आंध्र, तेलंगणाच्या एनसीसी संचालनालयाकडे ‘आरडी बॅनर’; दिल्लीची मान्या ठरली ‘बेस्ट कॅडेट’

पंतप्रधान रॅलीमध्ये झाला गौरव

प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या एनसीसी परेडमध्ये सहभागी झालेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या एनसीसी संचालनालयानं सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा बॅनर जिंकला आहे. तसेच दिल्लीच्या मान्या एम. कुमार हीने देशभरातील कॅडेट्समधून बेस्ट कॅडेटचा पुरस्कार पटकावला.

विजयाबद्दल आंध्र प्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाचे उपमहासंचालक म्हणाले, “आमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे. यंदा कोविड-१९ मुळे एनसीसीच्या अनेक उपक्रमांवर निर्बंध आले होते. मात्र, तरीही एनसीसी संचालनालयानं चांगली कामगिरी केली. उत्कृष्ट संचालनालयाचा बॅनर जिंकण्याची ही आमची पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही आम्ही बाजी मारली आहे.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या एनसीसी परेडमध्ये सहभागी झालेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या एनसीसी संचालनालयानं सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा बॅनर जिंकला आहे. तसेच दिल्लीच्या मान्या एम. कुमार हीने देशभरातील कॅडेट्समधून बेस्ट कॅडेटचा पुरस्कार पटकावला.

विजयाबद्दल आंध्र प्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाचे उपमहासंचालक म्हणाले, “आमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे. यंदा कोविड-१९ मुळे एनसीसीच्या अनेक उपक्रमांवर निर्बंध आले होते. मात्र, तरीही एनसीसी संचालनालयानं चांगली कामगिरी केली. उत्कृष्ट संचालनालयाचा बॅनर जिंकण्याची ही आमची पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही आम्ही बाजी मारली आहे.”

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

दिल्लीची मान्या कुमार ठरली बेस्ट कॅडेट

केरळच्या एर्नाकुलम येथील मूळची रहिवासी असलेल्या मान्य एम. कुमार या विद्यार्थीनीने पंतप्रधान रॅलीमध्ये बॅटन ऑफ रिकग्निशन आणि मेडल ऑफ बेस्ट कॅडेट (आर्मी सिनिअर विंग) किताब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्विकारला. मान्य ही सध्या दिल्ली विद्यापीठात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून तिचं शालेय शिक्षण कोची येथील नेवल बेसमधील केंद्रीय विद्यालयातून झालं आहे.