आदिवासींच्या शाश्वत रोजगारासाठी विशेष प्रयत्न

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवणतर्फे मालेगाव येथील कृष्णा लॉन्स येथे भुसे यांच्या हस्ते आदिवासींना खावटी संच वाटप करण्यात आले.

कृषिमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन

नाशिक :  करोना संकटात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात आली. परंतु, आदिवासी बांधव खावटीवर अवलंबून राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी शाश्वत रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावरुन विशेष प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवणतर्फे मालेगाव येथील कृष्णा लॉन्स येथे भुसे यांच्या हस्ते आदिवासींना खावटी संच वाटप करण्यात आले. यावेळी भुसे यांनी मार्गदर्शन के ले. खावटी अनुदान योजनेतंर्गत लाभार्थ्यांंच्या बँक खात्यावर दोन हजार रुपयाचे अनुदान वर्ग करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात खावटी संचाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. आदिवासी बांधवाना निकृष्ठ वस्तूंचे वाटप झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. अजूनही पात्र लाभार्थ्यांंची नोंदणी राहिली असल्यास त्यांनाही लाभ देण्याच्या सूचना भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

जिल्ह्यतील जे कोणी आदिवासी बांधव कामधंद्यानिमित्त इतरत्र स्थलांतरीत झाले होते. त्यांच्याशी आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून पात्र लाभार्थ्यांंचे अर्ज भरुन त्यांना लाभ दिला असला तरी याव्यतिरिक्त कोणी लाभार्थी शिल्लक असतील तर त्यांनी जवळच्या आश्रमशाळेशी संपर्क साधून अर्ज भरुन घेण्याचे आवाहन भुसे यांनी केले.

सुमारे ७५० लाभार्थ्यांंना योजनेतंर्गत मोफत रेशनकार्ड देण्यात आले असून ज्यांना रेशनकार्ड मिळालेले नाहीत त्यांनी संबंधित कार्यालयात कागदपत्रे सादर करुन मोफत रेशनकार्ड बनवून घेण्याचे आवाहन भुसे यांनी केले.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी प्रास्ताविकातून खावटी अनुदान योजनेची माहिती दिली.ा कळवण प्रकल्पातंर्गत एकूण ११ हजार ९९२ नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यापैकी १० हजार ९९ इतक्या पात्र लाभार्थ्यांंना मंजुरी देण्यात आली असून आठ  हजार ६८२ नागरिकांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद के ले. यावेळी  बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, उपप्रादेशिक अधिकारी तुषार मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी जे.एस.चौधरी आदींसह तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा