दिवाळीच्या आधी सगळ्यांना मदत मिळणार असल्याचंही जाहीर
अतिवृष्टी आणि पूर यामुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. दिवळीच्या आधी सगळ्यांना मदत मिळणार असंही त्यांनी म्हटलं आहे. फळपीक नुकसानग्रस्तांसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत केली जाणार. रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिरायत आणि बागायत नुकसानग्रस्तांसाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या हक्काचे ३८ हजार कोटी केंद्राकडे प्रलंबित आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.