‘इंडिया’च्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार

इंडिया आघाडीच्या आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे.

इंडिया आघाडीच्या आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे. जागावाटप हा आघाडीतील कळीचा मुद्दा असला तरी केवळ जागावाटपाच्या सूत्रापुरतीच चर्चा मर्यादित ठेवली जाईल. मतभेद होतील अशी कोणतीही कृती सध्या तरी केली जाणार नाही.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

इंडिया बैठकीसाठी नेतेमंडळी मुंबईत दाखल होऊ लागली आहेत. पाटणा आणि बंगळुरूनंतरची तिसरी बैठक यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांची एकजूट अधिक भक्कम कशी होईल यावरच अधिक भर दिला जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण झाल्यावर विरोधी नेत्यांची अनौपचारिक चर्चा होईल. शुक्रवारी दिवसभर आगामी रणनीतीवर खल केला जाईल.