इस्रायलच्या सैनिकांनी गाझा शहराला चारही बाजूंनी घेरले; हमासने दिला ‘हा’ इशारा

इस्रायल हमासविरोधात जमिनी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये इस्रालयच्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल आणि हमासमधील ७ नोव्हेंबरला युद्धाला एक महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले चालूच आहेत. इस्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहेत. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला चारही बाजूने घेरले आहे.

इस्रायल लष्कराचे प्रवक्ता हेनियल हगारी म्हणाले, “इस्रायलच्या सैन्यांनी हमास आतंकवादी संघटनेचे केंद्र असलेल्या गाझा शहराला घेरले आहे. दोन्हीबाजूंनी युद्ध थांबण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही.”

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

हमासचा सशस्त्र लष्करप्रमुख अबू उबैदाने इस्रायलचे सैनिक काळ्या बँगमध्ये माघारी परततील, असा इशारा दिला आहे. “इस्रायलच्या लष्करानं गाझा पट्टीत मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या जाहीर केली होती. पण, इस्रालयने जाहीर केलेल्या संख्येपेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत. तुमचे सैनिक काळ्या बँगमध्ये परततील,” असं अबू उबैदाने सांगितलं.

इस्रालयने गाझावर केलेल्या हल्ल्यात ९ हजार ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ हजार ७६० लहान मुलांचा आणि २ हजार ३२६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत ३२ हजार नागरिक जखमी झाले आहेत. दुसरीकडे हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १ हजार ४०५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ हजार ४३१ नागरिक जखमी झाले आहेत.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?