‘ईपीएफ’वरील व्याज आजपासून खात्यात

६ कोटी सदस्यांना ८.५ टक्के व्याजदर देण्याबाबतची केंद्रीय कामगार खात्याची शिफारस अर्थ विभागाने मान्य केली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मिळणारे २०१९-२० साठीचे वार्षिक व्याज ८.५ टक्केच कायम राहणार आहे. हे व्याज नववर्षांपासून (१ जानेवारी २०२१) कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ६ कोटी सदस्यांना ८.५ टक्के व्याजदर देण्याबाबतची केंद्रीय कामगार खात्याची शिफारस अर्थ विभागाने मान्य केली आहे. कामगारमंत्री संतोष गंगवार हे अध्यक्ष असलेल्या संघटनेने याबाबत सर्वप्रथम मार्च २०२० मध्ये शिफारस केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये संघटनेने हे व्याज विभागून देण्याबाबतची सूचना केली होती. मात्र त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही.

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!