उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या ३५ जागांसाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या ३५ जागांसाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी मतदान जळगाव जिल्ह्यात झाले आहे. नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी ६५ ते ६६ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक उत्साह होता.सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ६०.११ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या तासात टक्केवारीत पाच ते सहा टक्क्यांनी भर पडण्याचा अंदाज आहे. आदिवासी राखीव मतदारसंघात उत्स्फुर्त मतदानाची परंपरा कायम राहिली. जळगावमध्ये ६० टक्के, धुळे ६४, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६८ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी नवापूर मतदारसंघात ७८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. धुळे जिल्ह्यात अंदाजे ६२ टक्के मतदान झाले. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात अंदाजे ६० टक्के मतदान झाले.