‘उनके हर सांस मे साज था’…अमूलकडून खास अंदाजात पंडित शिवकुमर शर्मा यांना श्रद्धांजली

पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली.

प्रसिद्ध संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजारानेही त्रस्त होते. त्यांच्यावर डायलिसिसने उपचार सुरू होते. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाची बातमी कळताच प्रत्येक स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहली जात आहे. डेअरी ब्रँड अमूलनेही शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहली आहे. अमूलने पंडितजींसाठी एक खास डूडल तयार केले आहे. ‘उनके हर सांस मे साज था’ असे वाक्य त्या डूडलवर लिहले आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांनी भारतीय संगीताला राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख मिळवून दिली.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

संतूर या काश्मीरी लोकवाद्याला संगीतात मानाचे स्थान मिळवून

गेल्या दोन वर्षांत, करोनाच्या साथीमुळे पंडितजी आपल्या निवासस्थानातून फारसे बाहेर पडत नव्हते. क्वचितच ते कार्यक्रमांना हजेरी लावत होते.
भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले. पं. शिवकुमार शर्मा यांना १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.