एअर इंडियाचा दिल्ली-मॉस्को विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय!

ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट काढलेलं आहे त्यांना पूर्ण परतावा मिळणार असल्याचंही सांगितलं आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतावरही होऊ लागला आहे. एअर इंडियाने दिल्ली ते मॉस्कोचे विमानसेवा रद्द केली आहे. एअर इंडियाची विमाने आठवड्यातून दोनदा दिल्लीहून मॉस्कोला जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा संरक्षण न मिळाल्याने एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याशिवाय, ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट काढलेलं आहे त्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे रशियाकडे उड्डाण करणाऱ्या विमानांना जास्त धोका आहे, त्यामुळे विमानांना विमा संरक्षण मिळत नाही.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

एअर इंडियाने तिकीट विक्री केली बंद –

रशियन दूतावासाने सांगितले की, प्रिय नागरिकांनो, भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने दिल्ली-मॉस्को-दिल्ली मार्गावरील तिकिटांची विक्री बंद केली आहे, याकडे आम्ही आपले लक्ष वेधतो. या विमान कंपनीची रशियाला उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता सध्या अनिश्चित आहे. एअर इंडियाच्या कार्यालयानुसार प्रवाशांना रद्द केलेल्या विमानांसाठीचा पूर्ण परतावा मिळण्याचा हक्क आहे.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

तथापि, रशियन दूतावासाने सांगितले की ताश्कंद, इस्तंबूल, दुबई, अबू धाबी, दोहा आणि इतर प मार्गांद्वारे दिल्ली ते मॉस्कोपर्यंत उड्डाण करणे अद्याप शक्य आहे.