एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

एप्रिल महिन्यातील ताप्त्या उन्हात सूर्यास्तानंतर अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल राहणार आहे.

अकोला : एप्रिल महिन्यातील ताप्त्या उन्हात सूर्यास्तानंतर अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल राहणार आहे. याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि सर्वात लहान बुध ग्रह पश्चिमेस सूर्यास्तानंतर काही वेळाने सज्ज असतील. पहाटेच्या गारव्यात मंगळ, शनी आणि शूक्र सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजाची शोभा वाढवताना दिसतील. जगातील सर्वात महागडे आंतरराष्ट्रीय अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र रात्रीच्या प्रारंभी सलग चार दिवस चमकदार स्वरूपात बहुसंख्य लोकांना सहज आणि नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. अक्षवृत्तीय तथा रेखावृत्तीय स्थितीनुसार काहीसा वेळ, दिशा आणि तेजस्वीतेत बदल घडून येईल. महाराष्ट्रभर हा अनोखा आकाश नजारा बघता येणार आहे.

हे वाचले का?  Lockdown Effect on Moon : पृथ्वीवरील ‘कोविड लॉकडाउन’मुळे चंद्राच्या तापमानात घट; अभ्यासातील निष्कर्ष

३ एप्रिलला रात्री ७.४९ ते ७.५३ यावेळी एक ठळक चांदणी वायव्य ते आग्नेय दिशेला आकाश मध्याजवळून जाईल. ४ ला ७.०१ ते ७.०७ यावेळी उत्तरेकडून पूर्व क्षितिजावर ५.४५ मिनिटापर्यंत दिसेल. ५ रोजी ७.४९ ते ७.५४ या पाच मिनिटांपर्यत पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाताना आणि शनिवारी पुन्हा ७.०१ ते ७.०७ या वेळेस वायव्य ते आग्नेय बाजूस दिसेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

निसर्गातील सावल्यांचा खेळ आणि त्यातील खग्रास सूर्यग्रहण म्हणजे आकाश प्रेमींसाठी एक आनंद पर्वणीच. पृथ्वी, चंद्र व सूर्य एका रेषेत आल्याने घडून येणारा हा नजारा ८ एप्रिलला घडून येत आहे. याचा लाभ अमेरिका, कॅनडा भागात खग्रास स्थितीत तर काही ठिकाणी खंडग्रास असेल. आपल्या देशात हे खग्रास सूर्यग्रहण पाहता येणार नाही, असे प्रभाकर दोड म्हणाले.

ग्रह युती एक अप्रतिम अनुभुती

१० एप्रिल रोजी पहाटे पूर्व आकाशात वलयांकित शनी ग्रह आणि लालसर रंगाचा मंगळ ग्रह कुंभ राशीत २० व्या अंशावर एकमेकांच्या अगदी जवळ बघण्याची संधी येणार आहे. सर्वांनी ती अवश्य अनुभवावी, असे आवाहन देखील दोड यांनी केले.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?