‘एमपीएससी’च्या निकालाची ४ लाख २० हजार उमेदवारांना प्रतीक्षा, दिरंगाईमागील कारण काय? जाणून घ्या…

तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे.

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

एमपीएससीच्यावतीने संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास ४ लाख २० हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी ४२ पदे, पोलीस उपनिरीक्षक ६०३ पदे, राज्य कर निरीक्षक ७७ पदे, दुय्यम निबंधक/मुद्रांक शुल्क ७८ अशी एकूण ८०२ पदे आहेत. या पदांसाठी परीक्षा झाल्यावर तृतीय पंथी उमदेवारांसाठी वेगळे निकष ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी समितीने अहवालही तयार केला. मात्र, हा अहवाल अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीत आलेला नाही. त्यामुळे निकाल रखडला आहे.