“करोनाच्या लसीत वापरण्यात आलंय गायीचं रक्त, जीव गेला तरी चालेल पण…”; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

“करोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र…”

देशामध्ये करोनाची लस येण्याआधीच यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी करोना लसीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. स्वामी चक्रपाणि यांनी करोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. गायीचं रक्त असणारी ही लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केलीय. चक्रापाणि यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनही केल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे.

मग करोना लसीबद्दल माहिती का देत नाही?

स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत करोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आलीय हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असं म्हटलं आहे. “करोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही. जेव्हा कोणतीही कंपनी एखादं औषध बनवते तेव्हा त्यामध्ये काय आहे याची माहिती दिली जाते. मग करोनाच्या लसीसंदर्भातील माहिती का सार्वजनिकरित्या उपलब्ध करु दिली जात नाहीय. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकामध्ये जी लस तयार करण्यात आलीय त्यामध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं आहे,” असा दावा स्वामी चक्रपाणि यांनी केलाय.

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

गायीचं रक्त शरीरात गेलं तर

“सनातन धर्मामध्ये गायीला मातेसमान मानण्यात येतं. जर गायीचं रक्त आपल्या शरीरामध्ये गेलं तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून असे कट रचले जात आहेत. त्यामुळेच करोनाची कोणतीही लस येत असेल तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जावी. जेव्हा सर्व शंका दूर होतील त्यानंतरच लसीकरणाचं काम हाती घेण्यात यावं,” असंही स्वामी चक्रपाणि म्हणाले आहेत.

हे वाचले का?  Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?

सगळी माहिती द्यावी…

स्वामी चक्रपाणि यांनी प्रामुख्याने अमेरिकेतील लसीसंदर्भात भाष्य केलं आहे. गायीचं रक्त वापरण्यात आलेली लस ही अमेरिकेतील लस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी अमेरिकन लसीचा संदर्भ देत भारतामध्ये देण्यात येणाऱ्या लसीबद्दल सर्व माहिती आधी सर्वसामान्यांना देण्यात यावी. ही लस कोणाला देण्यात येणार कोणाला नाही याबद्दलची माहिती द्यावी असं स्वामी चक्रपाणि म्हणाले आहेत.

जीव गेला तरी चालेल पण…

“पहिल्यांदा विश्वास निर्माण करा मग वापर करा या धोरणाचा आपण अवलंब केला पाहिजे. या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलेल नाही असा विश्वास आधी जनतेमध्ये निर्माण करावा लागेल. त्यानंतर ही लस द्यावी. जीव गेला तरी चालेल पण धर्म भ्रष्ट होता कामा नये. जोपर्यंत करोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलेलं नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत अगदी जीव गेला तरी ही लस घेणार नाही,” असंही स्वामी चक्रपाणि म्हणाले.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

पुढील महिन्यापासून भारतामध्ये करोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील सरकारांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु झाली असून तयारीलाही सुरुवात झाली आहे. भारतामध्ये देण्यात येणारी लस ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.