आगामी वर्षांतील काही निवडक स्पर्धाचा घेतलेला हा आढावा-
करोनामुळे गेल्या वर्षीचे जवळपास संपूर्ण वेळापत्रक कोलमडल्यानंतर आता आगामी वर्षांत मैदानावर उतरून दोन हात करण्याची आशा खेळाडूंना वाटू लागली आहे. करोनामुळे एक वर्षांने लांबणीवर पडलेली जगातील सर्वात प्रतिष्ठेची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा तसेच युरो चषक फुटबॉल, पुरुष आणि महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धाची पर्वणी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. आगामी वर्षांतील काही निवडक स्पर्धाचा घेतलेला हा आढावा-
१ फिफा क्लब विश्वचषक फुटबॉल : १ ते ११ फेब्रुवारी (कतार)
२ इंग्लंडचा भारत दौरा (क्रिकेट) : ५ फेब्रुवारी ते १४ मार्च (भारत)
३ ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा : ८ ते २१ जानेवारी (मेलबर्न)
४ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा : १७ एप्रिल ते ३ मे (शेफिल्ड, इंग्लंड)
५ फ्रेंच खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा : २३ मार्च ते ६ जून (पॅरिस)
६ युरो चषक फुटबॉल स्पर्धा : ११ जून ते ११ जुलै (युरोपमधील १२ देशांमध्ये)
७ कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : ११ जून ते ११ जुलै (अर्जेटिना/कोलंबिया)
८ विम्बल्डन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा : २८ जून ते ११ जुलै (लंडन)
९ टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : २३ जुलै ते ८ ऑगस्ट (टोक्यो)
’ टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर (टोक्यो)
१० टूर डे फ्रान्स सायकल शर्यत : २६ जून ते १८ जुलै (फ्रान्स)
११ महिला युरो चषक फुटबॉल स्पर्धा : ७ जुलै ते १ ऑगस्ट (इंग्लंड)
१२ जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा : ६ ते १५ ऑगस्ट (युगेन, अमेरिका)
१३ जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : ऑगस्ट महिन्यात अपेक्षित (नवी दिल्ली)
१४ अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा : ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर (न्यूयॉर्क)
१५ आयसीसी ट्वेन्टी-२० चषक क्रिकेट स्पर्धा : १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर (ऑस्ट्रेलिया)
१६ जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा : १३ ते १८ डिसेंबर (अबू धाबी)
१७ युरोपातील फुटबॉल मोसमाला सुरुवात : (इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लीगा, बुंडेसलीगा, फ्रेंच लीग-१) ऑगस्ट महिन्यात
१८ एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : १४ ते २१ नोव्हेंबर (ठिकाण अद्याप अनिश्चित)
१९ इंडियन प्रीमियर लीग : मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात
२० प्रो कबड्डी लीग : अद्याप वेळापत्रक आणि ठिकाण अनिश्चित
२१ जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा : १६ ते २६ सप्टेंबर (ठिकाण अनिश्चित)
(संकलन : तुषार वैती)