करोना लस सुरक्षित; पंतप्रधानांची ग्वाही

लशीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये

करोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवकांशी संवाद साधताना स्पष्ट केले. लशीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

दृकश्राव्य माध्यमातून साधलेल्या संवादात त्यांनी सांगितले की, डॉक्टर व सर्वच आरोग्य सेवकांनी ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला असून लोकांना त्यातून ठोस संदेश गेला आहे.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

ज्या डॉक्टरांना लशी दिल्या गेल्या किंवा ज्यांनी कुणी लशी घेतल्या त्यांनी त्यांचे अनुभव जाहीरपणे सांगितले आहेत. त्यामुळे कोविड लशीबाबत कुणाच्या मनात गैरसमज असतील तर ते काढून टाकावेत. या लशी सुरक्षित व परिणामकारक आहेत. करोना योद्धय़ांनी या साथीच्या काळात ठोस काम केले आहे, असे सांगून तीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी मुख्य परिचारिका व इतर डॉक्टरांनी या लशीचे कुठलेही दुष्परिणाम नसल्याचे स्पष्ट केले. अनेक आरोग्य सेवक लस घेण्यास पुढे येत नसल्यामुळे आरोग्य खाते चाचपडत असताना पंतप्रधान मोदी यांनी हा संवाद साधला.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

ते म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असून आमचे आघाडीचे करोना योद्धे यात सहभागी होते. आता डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. हे आरोग्य कर्मचारी त्यांचे लशीबाबतचे अनुभव सांगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीपासून तीन कोटी आरोग्य कर्मचारी व आघाडीच्या कार्यकर्त्यांना लस देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी