कसं होतं सरतं वर्ष? देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी आणि मुत्सदीपणासाठी ओळखले जातात. राजकारणात आल्यापासूनच ते अभ्यासू व्यक्ती आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. तसंच नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक अशीही देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. २०१९ च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी मी पुन्हा येईन हा त्यांचा डायलॉगही गाजला होता. याच देवेंद्र फडणवीसांनी सरतं वर्ष म्हणजेच २०२३ कसं होतं त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याची X या सोशल मीडिया माध्यमावर चांगलीच चर्चा होते आहे.

हे वाचले का?  Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

काय आहे देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत?

हा व्हिडीओ सुरु होतो मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियापासून. त्यानंतर हेलिकॉप्टरचं दर्शन होतं. तसंच शिवजन्माचा सोहळाही समोर दिसतो. जपान आणि मॉरीशसची देवेंद्र फडणवीस यांची वारीही दिसते. गोविंदा, गणपती, दसरा, दिवाळी, विठ्ठलाची कार्तिकीची महापूजा या सगळ्या गोष्टीही दिसतात. तसंच अभिवादन करणारे, लोकांच्या भेटीगाठी घेणारे, समृद्धी महारामार्गावर ड्राईव्ह करणारे, सी लिंकची पाहणी करणारे देवेंद्र फडणवीसही दिसतात. अवघ्या अडीच मिनिटांच्या या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभराचा आढावा घेतला आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली. याचाही उल्लेख या व्हिडीओत आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतानाही देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. अत्यंत धावता आढावा या व्हिडीओत घेण्यात आला आहे. आता लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ येऊन ठेपलं आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सरत्या वर्षाचा असला तरीही तो प्रचाराच्या दृष्टीनेच तयार करण्यात आला आहे हे स्पष्ट होतं. This is what 2023 was made of.. असं कॅप्शनही देवेंद्र फडवीस यांनी दिलं आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले