कहर… युक्रेनच्या सीमेवर सहा बॅगांमध्ये सापडले २१३ कोटी रुपये; नेत्याच्या पत्नीला कस्टमने घेतलं ताब्यात

य़ा प्रकरणामध्ये आता सीमेवरील सुरक्षारक्षकांविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे लाखो लोकांना युक्रेन सोडलाय. यामध्ये यूक्रेनमधील एका माजी खासदाराच्या पत्नीचाही समावेश आहे. मात्र या महिलेने देश सोडताना स्वत:सोबत आणलेल्या बॅगांमधील सामान पाहून हंगेरी देशातील अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. हंगेरीमधील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या बॅगमध्ये अमेरिकी डॉलर्स आणि यूरो या चलनांमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. सहा मोठ्या बॅगांमध्ये जवळजवळ २८ मिलियन डॉलर्स आणि १,३ मिलियन यूरो रोख रक्कम मिळाली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम २१३ कोटी इतकी आहे.

हे वाचले का?  Khalida Zia : बांगलादेशात राजकीय घडामोडींना वेग; शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी तुरुंगातून सुटणार!

विनो या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हे पैसे वादात असणारे माजी खासदार इगोर कोटवित्स्की यांची पत्नी अनास्तासिया कोटवित्स्का यांच्याकडे सापडलेत. ५२ वर्षीय कोटवित्स्की हे एकेकाळी युक्रेनमधील सर्वात श्रीमंत खासदार होते. अनास्तासिया यांनी हे पैसे नक्की कुठून आणले यासंदर्भातील माहिती तपास यंत्रणांना दिलेली नाही.

अनास्तासिया यांनी विस्थापितांसाठी हंगेरीमध्ये प्रवेश देण्यात येत असणाऱ्या चेकपोस्टवरुन देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश घेऊन जाताना कस्टम अधिकाऱ्यांना चकवा देण्याचा तिचा विचार होता. मात्र यात तिला यश आलं नाही. कस्टम विभागाने जारी केलेल्या फोटोंमध्ये नोटांनी भरलेल्या सहा बॅग सापडल्या. तपासादरम्यान माजी खासदाराच्या पत्नीने या पैशांमध्ये समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलीय. दुसरीकडे कोटवित्स्की यांनी सोशल मीडियावरुन, “माझे पैसे युक्रेनच्या बँकांमध्ये आहेत. मी युद्ध सुरु झाल्यानंतर पैसे काढलेले नाहीत,” असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपलं अकाउंटही बंद केलंय.https://platform.twitter.com/embed/Tweet.html?

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

अनास्तासिया यांनी युक्रेनमधील विलोक येथील चेक पॉइण्टवर त्यांच्याकडे बॅगेत असणाऱ्या पैशांबद्दल माहिती दिली नव्हती. मात्र हंगेरीच्या कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता अब्जावधी रुपये सापडले. आता युक्रेन आणि हंगेरीच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. लाच घेऊन या कर्मचाऱ्यांनी देशातील पैसा बाहेर घेऊन जाण्यास परवानगी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जाईल असं म्हटलं जातंय.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन