कांदा दरात अल्प वाढ

मागील तीन-चार दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत आहे.

मनमाड : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावाने काही प्रमाणात उसळी घेतली आहे. गुरुवारी उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी १७००, तर लाल कांद्याला २१०० रुपये भाव मिळाला.

मागील तीन-चार दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत आहे. लाल कांद्याची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. देशांतर्गत बाजारपेठेत त्या त्या राज्यातून कांदा येऊ लागल्याने मागणीत काहीशी घट झाली आहे. या सर्वाचा परिणाम स्थानिक बाजारावर पडला होता. या घटनाक्रमात गुरुवारी कांदा दरात काहीशी वाढ झाली. उन्हाळ कांद्याची २७ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. त्यास किमान ८०० ते कमाल १९१०, सरासरी १७०० रुपये क्विंटल भाव मिळाले.  गेले दोन दिवस १४०० ते १४५० असे भाव असताना या कांद्याच्या भावात ३०० रुपयांनी उसळी घेतली. लाल कांद्याची ३९१ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल २३११ सरासरी २१०० रुपये भाव मिळाला. सफेद कांदा २१ नग आवक झाली. त्यास सरासरी २६५० रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार धान्य, कडधान्य विभागात बाजरी ११९० रुपये, गहू १५००, हरभरा ३५४१, तूर ४८९०, मूग ३८००, तर कुळीदला १००० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. मक्याची ८६ नग इतकी आवक झाली. त्याचे सरासरी १२७५ रुपये क्विंटल असे भाव होते.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार