कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत हत्येचा उलगडा, जळगाव पोलिसांची कामगिरी

जळगाव पोलिसांनी कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना एका हत्येच्या प्रकरणाचा २४ तासाच्या आत उलगडा केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावाजवळ कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या ठिकाणी केवळ सांगाडा शिल्लक असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. मात्र, अशा स्थितीतही जळगाव पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला. यामुळे जळगाव पोलिसांचं कौतूक होत आहे.

जळगाव पोलिसांनी मृतदेहाची चप्पल आणि त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान जिल्ह्यात हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली. यात भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात राहणारा रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसात दिल्याचं समोर आलं.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

या तक्रारीचा आधार घेत रोहितचे कपडे आणि चप्पलच्या माध्यमातून मृतदेह रोहित कोप्रेकार याचाच असल्याचं तपासात निष्पन्न झालं. रोहितचां मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड आणि कपडेही आढळून आले. त्यामुळे रोहितचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेह पूर्णपणे कुजला असल्याने पोस्टमार्टममध्ये कारण स्पष्ट होणे कठीण होते. पीडित रोहितचा खून झाला असला तरी तो कोणी आणि का केला याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर नसल्याने पोलिसांना त्याचा तपास करणे मोठे आव्हान होते.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

ज्या भागात रोहितचा मृतदेह आढळून आला त्या भागात असलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली. त्यात रोहित बेपत्ता झाला त्या दिवशी त्याच्यासह अन्य दोन तरुण एका हॉटेलात दारू पीत असल्याचं फुटेजमध्ये आढळलं. हाच धागा पकडून पोलिसांनी या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखविला. यानंतर रोहितच्या दोन मित्रांनी दोरीने गळफास देऊन त्याची हत्या केल्याचं कबूल केलं.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत