शिवाजी विद्यापीठाचे सन २०२३-३४ सालचे ५३८.९९ कोटी अपेक्षित जमा व ५३८.२९ कोटी अपेक्षित खर्च असलेले आणि ५.३० कोटी इतके तूट असलेले अंदाजपत्रक शुक्रवारी मंजूर करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाचे सन २०२३-३४ सालचे ५३८.९९ कोटी अपेक्षित जमा व ५३८.२९ कोटी अपेक्षित खर्च असलेले आणि ५.३० कोटी इतके तूट असलेले अंदाजपत्रक शुक्रवारी मंजूर करण्यात आले. विद्यापीठ निधीतील शिल्लकेतून तुट भरून काढण्यात येणार आहे.
प्रशासकीय विभागांकडून ३७.१४ कोटी रु., शास्त्र अधिविभागांकडून ४.८५ कोटी, इतर अधिविभागांकडून २.४७ कोटी जमा होण्याची अपेक्षा आहे. इतर उपक्रमांमधून २५.२८ कोटी असे ६९.७४ कोटी स्वनिधीत जमा अपेक्षित आहे. वेतन अनुदानापोटी शासनाकडून १२५.३० कोटी, वेगवेगळ्या संस्थांकडून प्रकल्पांसाठी १८.३७ कोटी जमा अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या संशोधन व विकास निधीतून ३२.१० कोटी रक्कम व घसारा निधीच्या शिल्लक रक्कमेतून १२ कोटी रक्कम जमेकरिता प्रस्तावित केलेली आहे. निलंबन लेख्यांमधून २७५.४७ कोटी असे ५३२.९९ कोटी जमा होणे अपेक्षित आहे.
खर्चाकरिता प्रशासकीय विभाग ५८.४० कोटी, शास्त्र अधिविभाग ७.५० कोटी, इतर अधिविभाग ६.२६ कोटी, विविध सेवा व इतर उपक्रम ४७.७३ कोटी असा स्वनिधीमधील १२० कोटी खर्च अपेक्षित आहे. वेतन अनुदान खर्च १३२ कोटी, विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या निधीमधून खर्चासाठी ६.१३ कोटी, संशोधन व विकास निधी ३२ कोटी व घसारा निधी १२ कोटी, निलंबन लेखे २३६ कोटी अशी एकूण ५३८.२९ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.