‘‘क्या गुंडा बनेगा रे तू?”, वसीम जाफरनं ‘या’ कारणामुळं इंग्लंड संघाला डिवचलं

इंग्लंड-न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स येथे खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. सलामीवीर डोम सिब्लेचे अर्धशतक आणि कर्णधार जो रूट याच्यासोबत त्याच्या अर्धशतकी भागीदारीमुळे इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या दिवशी न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. इंग्लंडला विजयासाठी किवी संघाने २७३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ ३ गडी गमावून १७० धावा करू शकला. हा कसोटी सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने इंग्लंड क्रिकेट संघाला ट्रोल केले असून एक मजेशीर मीमही शेअर केले आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

‘क्या गुंडा बनेगा रे तू’ हे मीम शेअर करताना जाफर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”जर तुम्ही घरच्या मैदानावर प्रत्येक षटकात ३.६च्या सरासरीने लक्ष्याचा पाठलाग देखील करू शकत नाही, ज्यात डब्ल्यूटीसीचा गुण जोडला जात नाही, तर कसे होईल? कसोटी क्रिकेटसाठी ही चांगली जाहिरात नाही.” जाफरच्या या ट्वीटवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

अलीकडच्या काळात मजेदार मीम्समुळे चाहत्यांमध्ये जाफर प्रसिद्ध झाला आहे. इंग्लंड संघाला ट्रोल केल्यानंतरही चाहत्यांनी जाफरच्या मीमबाबत पसंती दर्शवली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आता दुसरा कसोटी सामना शुक्रवारी खेळला जाईल.

पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पूर्ण फ्लॉप ठरला. न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या कॉनवेने द्विशतक शतक झळकावून आपल्या कसोटी कारकीर्दीची चांगली सुरुवात केली. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक –

  • न्यूझीलंड : ३७८/१०, १६९/६ (डाव घोषित)
  • इंग्लंड : २७५/१०, १७०/३ (सामना अनिर्णित)