“खाऊन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार…”; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज सभागृहाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी

नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवासाच्या कामाकाची सुरुवात विरोधकांच्या घोषणाबाजीने झाली. महाविकास आघाडीमधील घटकपक्ष म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज सभागृहाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली. “राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो…” अशी घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

“५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला… राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय… खाऊन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…” अशा घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. विधानभवनाच्या पायर्‍यांवर आज दुसऱ्या दिवशीही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याचं पहायला मिळालं.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसर दणाणून सोडला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात आंदोलन केले.