गतिमान विकासामुळे रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधींत वाढ : मोदी; मेळाव्यात ७१ हजारांवर युवकांना नियुक्तिपत्रे

मोदी यांनी सांगितले, की सातत्याने होणारे हे रोजगार मेळावे आता आमच्या सरकारची ओळख बनले आहेत

नवी दिल्ली : ‘‘भारत गतिमान विकास करत असून, पायाभूत सुविधा व संबंधित क्षेत्रांत मोठी प्रगती होत आहे. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही निर्माण करत आहेत. आपल्या सरकारने भरती प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानतेस उत्तेजन दिले. त्यात व्यापक बदल करताना ती अधिक सुव्यवस्थित व कालबद्ध केली आहे,’’ असा दावा माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.

दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागांसाठी निवड झालेल्या ७१ हजार ४२६ तरुणांना नियुक्तिपत्रांचे वाटप शुक्रवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, की देशात आयोजित केले जाणारे रोजगार मेळावे हे त्यांच्या सरकारचे वैशिष्टय़ बनले आहेत. आपले सरकार केलेला संकल्प पूर्ण करते, हे या उपक्रमांद्वारे स्पष्टपणे दिसते.

मोदी म्हणाले, की हा उपक्रम केवळ यशस्वी उमेदवारांमध्येच नव्हे तर कोटय़वधी कुटुंबांमध्ये नवी आशा पल्लवीत करेल. येत्या काही दिवसांत आणखी लाखो कुटुंबांतील सदस्यांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. मोदींनी यावेळी केंद्र सरकारसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि भाजप सत्तेत असलेल्या राज्यांत सातत्याने आयोजित केल्या जाणार्या रोजगार मेळाव्यांचा यावेळी उल्लेख केला. लवकरच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड अशा अनेक राज्यांते हे मेळावे घेतले जातील, अशी माहितीही दिली.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

मोदी यांनी सांगितले, की सातत्याने होणारे हे रोजगार मेळावे आता आमच्या सरकारची ओळख बनले आहेत. आमचे सरकार केलेला संकल्प कसा सिद्ध करते, हे यावरून दिसते. पारदर्शक पद्धतीने भरती आणि पदोन्नती तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. ही पारदर्शकता या युवकांना अधिक समर्थपणे स्पर्धेत सहभागी होण्यास प्रवृत्त करते. आमचे सरकार या संदर्भात सातत्याने काम करत आहे.

नियुक्तिपत्रे सुपूर्द करण्यापूर्वी, नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी बंधनह्ण प्रारुपाबद्दल त्यांचे अनुभव पंतप्रधानांसमोर मांडले. पश्चिम बंगालमधील सुप्रभा, काश्मीरच्या श्रीनगरमधील फैजल शौकत शाह, बिहारमधील दिव्यांग राजूकुमार आणि तेलंगणातील वाय. सी. कृष्णासह काही तरुणांनी आपल्या संघर्ष व अनुभव यावेळी सांगितले.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

नियुक्तिपत्र मिळालेले बहुतेक तरुण हे अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. त्यांच्यापैकी अनेक जण पाच पिढय़ांत सरकारी नोकरी मिळवणारे कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. सध्या प्रत्येक क्षेत्रात सरकार गतिमानतेने कार्यरत आहे. रस्ते आणि रेल्वेच्या जाळय़ाच्या विस्ताराची कामे व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, आज ‘भारतनेट’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक गावात ‘ब्रॉडबँड’ संपर्कव्यवस्था पुरवली जात आहे. बदलता भारत वेगाने वाटचाल करत आहे. जेव्हा विकास वेगाने होतो तेव्हा स्वयंरोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात निर्माण होऊ लागतात. आज भारत याचा अनुभव घेत आहे. पायाभूत सुविधांच्या मोठय़ा विकासामुळे गेल्या आठ वर्षांत लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

तिसरा टप्पा

मोदींनी गेल्या वर्षी दहा लाख युवकांना रोजगार देण्यासाठी ‘रोजगार मेळावा’ मोहिमेची घोषणा केली होती. या मेळाव्यांतर्गत नियुक्तिपत्र वाटपाचा हा तिसरा टप्पा होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात विविध पदांवर निवड झालेल्या ७१ हजार तरुणांना नियुक्तिपत्रे देण्यात आली होती. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्याद्वारे सुमारे ७५ हजार जणांना नियुक्तिपत्रे देण्यात आली होती.