दर महिन्याला ८५० टन लसीचे डोस पुरवले जाणार
अवघ्या जगाला करोनाच्या संकटानं घेरलेलं आहे. दरम्यान, या आजारावर अनेक देशांमध्ये विविध प्रतिबंधात्मक लसींवर संशोधन केलं जात आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, ती जगातील सर्वच देशांना पुरवणे तितकेच अवघड काम आहे. यासाठी आता युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला ८५० टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे.
यूनिसेफनं म्हटलं, “संघटना पुढील वर्षापासून प्रत्येक महिन्याला सुमारे ८५० टन लसीचे डोस गरजू देशांना पुरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा अभाव ठेवला जाणार नाही, तसेच प्राधान्याने हे काम केले जाईल.”
करोना प्रतिबंधक लस विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानही वापरली जातील. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हैनरिएटा फोर यांनी याची माहिती संघटनेवर ही एक मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. या कामी बरंच काही दावणीला लागलं आहे. तरीही संघटना ही जबाबदारी पूर्णपणे निभावण्यासाठी तयार असल्याचं युनिसेफनं म्हटलंय.
या जीवघेण्या आजारावर लस विकसित करणाऱ्या देशांकडून गरीब देशांमध्ये ७० हजार फ्रीजची खरेदी करुन ते पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत बसवले जातील. या आधुनिक फ्रीजच्या माध्यमातून करोना महामारीच्या लसीच्या उपलब्धतेचा परीघ वाढवण्यात येईल. ‘कोवैक्स’ लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी २ ते ८ डिग्री तापमानाची गरज असते. या कामात हे फ्रीज महत्वाची भूमिका बजावतील. या फ्रीजची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे हे फ्रीज सौर ऊर्जेवर चालतील. अशा प्रकारे या फ्रीजच्या माध्यमातून गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लस सहज उपलब्ध करुन दिली जाईल, असंही युनिसेफनं म्हटलं आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रॉस ऐडहेनॉम घेबरेयेसस यांनी पुन्हा एकदा म्हटलं की, “लस उपलब्ध झाल्यानंतरही काळजी घेण्यात कोणतीही बेपर्वाही केली जाऊ नये, असं झाल्यास आपण परिस्थिती सुधारण्याआधीच ती खराब करु. त्यामुळे त्यांनी जगातील सर्वच देशांना आवाहन केलं की, लसीच्या उपलब्धतेनंतरही मास्क लावणे, फिजिकल डिस्टंसिंग पाळण्याच्या नियमांचे कडक पालन केले जावे, अन्यथा सर्व मेहनतीवर पाणी फिरवल्यासारख होईल.