गुगल नकाशावार वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेअंतर्गत दर्शवण्यात आली आहेत.
नितीन बोंबाडे
ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया
डहाणू : महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने घुसखोरी करुन पथदिवे उभारल्याने सीमेचा वाद मिटलेला नसताना गुगल नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात दाखविल्याने नवा वाद उद्भवला आले. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गुगल नकाशावार वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेअंतर्गत दर्शवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वेवजी मधील इंडीया कॉलनी, दुकाने तसेच एमबीबीआय शाळा गुजरात राज्यात दिसत असल्याने सीमा भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं २०४ चा भुखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर. १७३ हे दोन भुखंडावर दोन राज्यांची सिमा आहे. गुजरात आणि महाराष्टर्् राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चिात नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत.महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा निश्चिात करण्याची मागणी होऊ लागली आहे.
गुगल नकाशामध्ये महाराष्ट्रातील सीमेलगतच्या गावे गुजरात राज्यात चुकिच्या पद्धतीने दाखवली जात असून त्यात दुरुस्ती करुन नवीन नकाशा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. -अश्विानी मांजे, प्रांत अधिकारी, तलासरी.
महाराष्ट्र गुजरात राज्यातील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्द ठरवणारा भुखंडाचा फेरफार क्र २८६ चा सर्वे नं. २०४ चा सातबारा महत्वाचा आहे. सातबारा मिळणेबाबत तहसीलदार, तलासरी यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे. फेरफार पडूनही सातबारा मिळत नाही. शोधकार्य सुरु आहे असे उत्तर मिळत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात घुसखोरी वाढत आहे. -अशोक धोडी, सामाजिक कार्यकर्ते, वेवजी