गृह, अर्थ, संरक्षण इतरांकडे; मोदींनी स्वत:कडे नेमकी कोणती खाती ठेवली? वाचा संपूर्ण यादी!

तिसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या एनडीएच्या पहिल्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ३६ राज्यमंत्री तर ५ स्वतंत्र कार्यभार असणारे मंत्री आहेत.

रविवारी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण ७१ खासदारांचा शपथविधी रविवारी पार पडला. त्यातले मोदींसह ६१ खासदार हे भाजपाचे आहेत. एकूण ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र पदभार राज्यमंत्री तर ३६ राज्यमंत्र्यांचा मोदींच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये समावेश आहे. यात पूर्णपणे भाजपाचा वरचष्मा असला, तरी उरलेल्या १० खासदारांमध्ये जेडीएस, टीडीपी, जेडीयू अशा इतर मित्रपक्षांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर या मंत्र्यांमध्ये झालेलं खातेवाटप सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

सोमवारी अर्थात १० जून रोजी उशीरा केंद्रीय मंत्रीमंडळाचं खातेपाटप जाहीर करण्यात आलं. त्यात भाजपानं सर्व महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहे. तसेच, वरीष्ठ मंत्र्यांची खातीही कायम ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार, राजनाथ सिंह संरक्षणमंत्री, अमित शाह गृहमंत्री, निर्मला सीतारमण अर्थमंत्री, जे.पी. नड्डा आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री, एस. जयशंकर परराष्ट्रमंत्री, नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री अशा ज्येष्ठ मंत्र्यांची खाती कायम ठेवण्यात आली आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन खाती स्वत:कडे ठेवली आहेत. त्याशिवाय, इतर ३० मंत्र्यांना वाटप न झालेल्या खात्यांचा कारभारही सध्या मोदीच पाहात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणती तीन खाती?

नरेंद्र मोदींनी रविवारी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. या सर्वात महत्त्वाच्या जबाबदारीसह मोदींकडे कार्मिक, तक्रार व निवृत्ती वेतन खात्याची जबाबदारी आहे. हे मंत्रालय म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमधील समन्वय, त्यांच्या तक्रारी व कामासंदर्भातील इतर बाबींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणारी यंत्रणा आहे. यात विविध पदांसाठी उमेदवारांची निवड, त्यांचं प्रशिक्षण, नोकरीअंतर्गत वृद्धी, कर्मचारी कल्याण अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

अणुऊर्जा विभाग

कार्मिक खात्याप्रमाणेच अणुऊर्जा विभागाचाही कार्यभार पंतप्रधानांकडे आहे. देशाच्या आण्विक संशोधन कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी या विभागाकडे असते. ३ ऑगस्ट १९५४ रोजी थेट राष्ट्रपतींच्या आदेशांनुसार या विभागाची निर्मिती करण्यात आली होती. या विभागाचा कार्यभार तेव्हापासून देशाच्या पंतप्रधानांकडेच असतो.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

अंतराळ विभाग

वरील दोन खात्यांव्यतिरिक्त फक्त केंद्राच्या अखत्यारीत येणारं आण पंतप्रधानांकडेच कार्यभार असणारं तिसरं खातं म्हणजे अंतराळ विभाग. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास व त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर या बाबींना प्रोत्साहन देऊन देशाच्या सर्वंकष विकासात भर घालणं ही या विभागाची प्रमुख जबाबदारी असते.

कॅबिनेट मंत्री व त्यांची खाती…

  • राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
  • अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
  • नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
  • जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
  • शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
  • निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
  • डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
  • मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
  • एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
  • पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
  • धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
  • जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
  • राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
  • सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
  • वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
  • के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
  • प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
  • जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
  • गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
  • अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
  • ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
  • भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
  • गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
  • अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
  • किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
  • हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
  • मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
  • जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
  • चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
  • सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री
हे वाचले का?  Supreme Court : बांगलादेशातून भारतात आलेल्या लोकांना ‘ओळख’ मिळणार? कलम 6 A बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तरी काय?

राज्यमंत्र्यांकडील खाती

  • जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री
  • श्रीपाद येसो नाईक – ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री
  • पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.
  • कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री
  • रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
  • राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.
  • नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.
  • अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री
  • व्ही. सोमन्ना – जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
  • चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.
  • एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री
  • शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री
  • कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री.
  • बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री
  • शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
  • सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री
  • डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
  • अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
  • बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री
  • कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री
  • भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
  • सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्री
  • संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
  • रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
  • दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
  • रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
  • सुकांता मजुमदार – शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री
  • सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
  • तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री
  • राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री
  • भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
  • हर्ष मल्होत्रा ​​- कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्री
  • निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
  • मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
  • जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
  • पबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री
हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती

  • राव इंद्रजित सिंह – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री, नियोजन राज्यमंत्री, सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री.
  • डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, अणुऊर्जा राज्यमंत्री, अंतराळ विभागातील राज्यमंत्री
  • अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
  • प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  • जयंत चौधरी – कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री