गोदावरीतील प्रदूषण आता रस्त्यावर

फेसामुळे वाहतूक बंद; नागरिकांच्या अडचणीत भर

फेसामुळे वाहतूक बंद; नागरिकांच्या अडचणीत भर

नाशिक : गोदा प्रदूषणाचा मुद्दा दिवसागणिक बिकट होत असून  एकलहरे ते ओढादरम्यान गोदावरी नदीत होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. मंगळवारी सकाळी गोदावरीतील फे साळयुक्त पाण्यामुळे येथील तात्पुरता रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले. थेट रस्त्यावर सांडपाण्याचा फेस जमा झाल्याने वाहतूक बंद करावी लागली. नदीतील प्रदूषण रस्त्यावरही आल्याने नागरिक हैराण झाले.

एकलहरे ते ओढादरम्यान पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात गोदावरीच्या पात्रातून रस्ता तयार करण्यात आला आहे. याच पर्यायी रस्त्याचा वापर एकलहरे, ओढा, शिलापूर, हिंगणवेढे, कोटमगाव ,सामनगाव येथील नागरिक करतात. विद्यार्थी, शेतकरी,कामगार याच रस्त्याने ये-जा करतात. काही महिन्यांपासून या पुलाखाली जमा होणाऱ्या रसायनयुक्त पाण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने ओरड सुरू आहे. परंतु, प्रदुषण नियंत्रण मंडळ या समस्येकडे डोळेझाक करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

हे वाचले का?  कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब

सोमवारी रात्री मालवाहू वाहन तात्पुरत्या रस्त्याने जात असतांना वाहन पाण्यात अर्धवट बुडाले. जेसीबी यंत्राच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्यात आले. असे लहान, मोठे अपघात येथे नित्याचे झाले आहेत. मंगळवारी सकाळी तर वेगळेच संकट उभे राहिले. फे साळयुक्त पाण्याने नागरिकांच्या अडचणीत भर घातली. सकाळी थंडगार वातावरणात फे साळयुक्त पाणी घट्ट होत असल्याने रस्त्याच्या मधोमध १५ ते २० फु ट उंचीची फेसाळ भिंत तयार झाली.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

एकलहरे परिसरात औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील दुषित पाण्यासह अन्य खासगी कं पन्यांचे दुषित पाणी गोदापात्रात सोडले जाते. या पाण्यामुळे गोदावरीतील पाण्याला  दुर्गंधीयुक्त वास येत असून नदीपात्रात फिरणेही मुश्किल झाले आहे. याविषयी प्रशासनाकडे तक्रोर करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. परिसरात मातोश्री महाविद्यालय, शाळा आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून हा रस्ता ओलांडावा लागत असल्याचे परिसरातील रहिवासी शरद राजोळे यांनी सांगितले.

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान