गोदावरी गौरव म्हणजे सर्व कलांचा सन्मान!

गोदावरी गौरव सन्मान म्हणजे सर्व कलांचा सन्मान आहे. या माध्यमातून कलेचे नवीन रूप समोर येत आहे.

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे उद्गार

नाशिक : गोदावरी गौरव सन्मान म्हणजे सर्व कलांचा सन्मान आहे. या माध्यमातून कलेचे नवीन रूप समोर येत आहे. सर्वानी कलेच्या वेगवेगळया प्रांतांचा आनंद घ्यावा, हा संदेश गोदागौरव पुरस्काराने दिला आहे, असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहात गोदावरी गौरव पुरस्कारांचे वितरण न्या. चपळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.   लहानपणी आपल्या वेगवेगळया इच्छा असतात. तसेच प्रत्येकाचे जीवन वेगवेगळया कलेत चितारलेले आहे. गोदावरी गौरव या साऱ्या कलांचे प्रतिबिंब आहे, असे न्या. चपळगावकर यांनी नमूद केले

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

या कार्यक्रमात नाटय़कर्मी अतुल पेठे, अमेरिकेतील विद्यापीठात संशोधन करणारे डॉ. हेमचंद्र प्रधान, देश-विदेशात कलावंत घडविणारे पंडित सुरेश तळवलकर, डॉ. सुधीर पटवर्धन, करोनाच्या संकटाला  सामोरे जाणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे, बिबटयाशी झुंज देऊन मुलाचे प्राण वाचविणाऱ्या सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी करोना काळात कामाचा आलेला ताण, अडचणी याविषयी माहिती दिली. केंद्र सरकारशी समन्वय साधत काम केल्याने राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू प्राणवायूअभावी झाला नाही. आव्हान हे संधी म्हणून स्वीकारल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या पुरस्काराचे खरे मानकरी करोना योध्दे आहेत, असे नमूद करीत टोपे यांनी पुरस्काराची रक्कम प्रतिष्ठानला परत केली.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस