‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना

करोना निर्बंधांमुळे यंदाही पालखी एसटीतूनच पंढरपूरला जाणार आहे

संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटीने पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. 1 जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता. दरम्यान, करोनाचं संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या. तर, आज एसटीमधून ग्यानबा तुकाराम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

1 जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत. हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात. परंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.

आज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली. तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एसटीमध्ये पादुका विसावल्या. तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता. एसटीमधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन