चला गं मंगळागौरीचा करू या जागर!

सण, व्रत, वैकल्याचा महिना मानल्या जाणाऱ्या श्रावणाला सुरुवात झाली असून या महिन्यातील कार्यक्र मांच्या मांदियाळीत मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे.

खेळांच्या सरावाला सुरुवात

नाशिक : सण, व्रत, वैकल्याचा महिना मानल्या जाणाऱ्या श्रावणाला सुरुवात झाली असून या महिन्यातील कार्यक्र मांच्या मांदियाळीत मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. नवविवाहितेला देवीजवळ अखंड सौभाग्याचे मागणे मागण्यासाठी मंगळागौर पूजली जाते. मागील वर्षी करोना संसर्गाच्या वेगवान फै लावामुळे मंगळागौरीच्या उत्सवावर विरजण पडले होते. यंदा मात्र करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे काही ठिकाणी मंगळागौरीच्या पूजेनिमित्त खेळण्यात येणाऱ्या खेळांच्या सरावाला सुरुवात झाली  आहे.

श्रावणातील मंगळवारी नवविवाहितांकडून पहिली पाच वर्षे मंगळागौर पुजली जाते. पूजेनंतर रात्री मंगळागौर जागविताना मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. त्यावेळी चला ग मंगळागौरीचा करूया जागर, नाच ग घुमा, झुंकू  लुकू  लुकू -कपाळी कु ंकू , लाटय़ा बाई लाटय़ा चंदनी लाटय़ा, मामाने दिल्या मला सारंगी पेटय़ा अशा वेगवेगळ्या गाण्यातून सासू-सून, नणंद-भावजय, माय-लेकी अशा वेगवेगळ्या नात्यांचे पदर अलवार गुंफले जातात. या नात्यांतील जुगलबंदी, रुसवे सारं काही गाण्यातून समोर येत असतांना नवविवाहिताही त्या गाण्यांवर ताल धरतात. मागील वर्षी करोनामुळे नवविवाहितांसह

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन दर्शन सुविधा

महिला वर्ग या आनंदाला पारखे झाले. करोनाचा संसर्ग आणि त्याविषयी असणारी भीती यामुळे मंगळागौर करणाऱ्या मंडळांनी, त्यामध्ये सहभागी महिलांनी कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाला असणारी उपस्थितांची मर्यादा लक्षात घेता अनेकांकडून हा कार्यक्र म घेणे टाळले गेले.

यंदाही करोनाचे सावट असल्याने संस्कार भारती परिवाराच्या वतीने मंगळागौरीचे कार्यक्र म करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील काही मंडळांनी बाहेरगावचे कार्यक्र म रद्द के ले आहेत. करोना संसर्गामुळे आम्ही कार्यक्र म घेणार नव्हतो. परंतु, समूहातील महिलांनी लसीकरण के ल्यामुळे तसेच ज्यांनी अद्याप के ले नाही त्यांनाही लसीकरण अनिवार्य केल्याने कार्यक्र मांना सुरुवात करण्यात येत असल्याचे हिरकणी समूहाच्या मृणाल कु लकर्णी यांनी सांगितले.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

यशश्री रहाळकर यांनीही हाच मुद्दा पुढे नेत कार्यक्र म घेणे न घेणे हे परिस्थितीवर अवलंबून असल्याचे नमूद के ले. सरावाला वेळ कमी मिळाला. याआधी आम्ही सभागृहात सराव करायचो, आता मैत्रिणींच्या घरी तेथील लोकांच्या वेळा लक्षात घेत सराव सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.