चांद्रयान ३ चे एक पाऊल पुढे, चंद्रावर उतरण्याच्या पूर्वतयारीला झाली सुरुवात

चंद्रावर उतरणारे Vikram lander हे मुख्य यानापासून वेगळे झाले आहे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रो ( ISRO ) तर्फे चंद्रावर उतरण्यापूर्वी चांद्रयान ३ ची वाटचाल ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली जात आहे. चंद्राभोवती १५० ते १७७ किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेतील एक महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

चंद्रावर प्रत्यक्ष उतरणारे Vikram lander हे मुख्य यानापासून वेगळे झाले आहे आणि आता त्याने मुख्य यानापासून काही अंतरावर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आहे अशी घोषणा इस्रोने केली आहे. आता उद्या म्हणजे १८ ऑगस्टला lander ची कक्षा आणखी कमी जाईल आणि ते आणखी चंद्राजवळ आणले जाईल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

तेव्हा सर्व पुढील नियोजित टप्पे सुरळित पार पडले तर येत्या २३ ऑगस्टला चांद्रयान ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.