चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”.

चांद्रसंशोधनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांद्रयान ४ चे महत्त्व अधोरेखित करताना एस. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे ठरवलेले उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सातत्यापूर्ण शोध आवश्यक आहे.

चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने इतर अनेक मोहिमा राबवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे २०२४ पर्यंत मानवयान चंद्रावर पाठवण्याची मोहीम. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या मोहिमेच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे, असं सांगितलं. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हे वाचले का?  भारत-पाकिस्तानकडून अणुकेंद्रांच्या यादीची देवाणघेवाण

चांद्रसंशोधनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांद्रयान ४ चे महत्त्व अधोरेखित करताना एस. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे ठरवलेले उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सातत्यापूर्ण शोध आवश्यक आहे.

“चांद्रयान मालिकेतील चांद्रयान ४ ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रगतीशील प्रयत्न सुरू आहेत. २०४० मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही संकल्पना सत्यात उतरवायची असेल तर आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे चंद्र संशोधन चालू झाले आहे”, असं सोमनाथ म्हणाले. “चांद्रयान ४ हे या दिशेने पहिले पाऊल आहे. चंद्रावर यानाचे पाऊल टाकणे आणि नमुना गोळा करून ते पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याचे असं चक्र असणार आहे”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हे वाचले का?  Mark Zuckerberg : मेटाने अखेर नमतं घेतलं, झुकरबर्ग यांच्या विधानासाठी कंपनीने मागितली भारताची माफी

सोमनाथ यांनी रॉकेट, उपग्रह उपक्रमांपासून ते तंत्रज्ञान विकास प्रयत्नांपर्यंतच्या प्रकल्पांच्या विविध पोर्टफोलिओची रुपरेषा मांडली. अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी इस्रोचा बहुआयामी दृष्टीकोन अधोरेखित करून त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली.