चीनमधून भारतीयांच्या माहितीवर डल्ला?

मायक्रोसॉफ्टआणि गुगलसह अॅपलच्या सॉफ्टवेअर यंत्रणाही सुरक्षित नसल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे

नवी दिल्ली : चीनमधील गुप्तचर यंत्रणा तसेच तेथील हॅकर्सनी ‘इमिग्रेशन’संदर्भात भारताच्या तब्बल ९५.२ गिगाबाईट विदावर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील हॅकर्सकडून अनेक परदेशी सरकारे, कंपन्यांच्या माहितीची चोरी करण्यात आली आहे.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

विशेष म्हणजे ‘द पोस्ट’च्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्टआणि गुगलसह ॲपलच्या सॉफ्टवेअर यंत्रणाही सुरक्षित नसल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. चीन सरकारसाठी कामे करणाऱ्या एका कंपनीमधील अज्ञात स्त्रोतांनी केलेल्या दाव्यानुसार ५७० पेक्षा अधिक फाईल्स, छायाचित्रे आणि चॅट लॉगची चोरी करण्यात आली आहे. ‘आयसून’ किंवा ‘ऑक्झून’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व शांघायमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी चिनी सरकारी कार्यालये, सुरक्षा यंत्रणा तसेच सरकारी उद्याोगांना हॅक केलेल्या माहितीची विक्री करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

जून २०२०मध्ये गलवान येथील चकमकीनंतर केंद्र सरकारने हेरगिरीच्या संशयावरून चिनी मोबाईल ॲपविरोधात कठोर कारवाई केली होती. सुमारे ६ हजार भारतीयांवर ‘झेनहुआ डेटा’ कंपनीने पाळत ठेवल्याचेही तपासात उघड झाले होते.