जगातल्या सगळ्यात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

  • गुजरातच्या कच्छमध्ये अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करणार

पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या कच्छमध्ये अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत. याचवेळी जगातील सर्वात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाचं देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. सरकारकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार,  या कार्यक्रमांदरम्यान शेतकरी व कारागिरांशी देखील मोदी संवाद साधणार आहेत. खवडा येथील जगातील सर्वात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाची मोदी पायाभरणी करतील. तसेच, दुपारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अरबी समुद्र किनाऱ्यावरील मांडवी येथील डिसेलिनेशन प्लांटची देखील पायाभरणी केली जाणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची उपस्थिती असणार आहे.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

३० हजार मेगावॅटचा पर्यायी वीज निर्मिती प्रकल्प जगातील सर्वात मोठा असणार आहे आणि वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्या व सौर पॅनल यांची  या ठिकाणी उभारणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.https://platform.twitter.com/embed/index.html?dnt=false&embedId=twitter-widget-0&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=1338647360696537088&lang=mr&origin=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh-news%2Fprime-minister-modi-will-lay-foundation-stone-of-worlds-largest-hybrid-renewable-energy-park-msr-87-2355192%2F&siteScreenName=loksattalive&theme=light&widgetsVersion=ed20a2b%3A1601588405575&width=550px

याशिवाय पंतप्रधान मोदी कच्छ आणि सौराष्ट्र भागातील अन्य चार डिसेलिनेशन प्लांट्सचे व्हर्चुअली भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये कच्छमधील गुंडियाली, देवभूमी द्वारकामधील गंधवी, भावनगरमधील घोघा आणि सोमनाथमधील सुत्रापाडा येथील प्रकल्पांचा समावेश आहे.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

याशिवाय पंतप्रधान मोदी कच्छ जिल्हा सहकारी दूध उत्पादक यूनियन, सरहद डेअरी यांनी अंजार आणि भाचाऊ जिल्ह्यात उभारलेल्या २ लाख लिटर क्षमतेच्या दूध शीतकरण केंद्राचे देखील ऑनलाइन भूमिपूजन करणार आहेत.