जगातील सर्वात प्राचीन बिअर फॅक्टरी; 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य उघड

दफनभूमीत बिअरची निर्मिती

इजिप्त हा देश प्राचीन संस्कृती आणि रहस्यमय वास्तूंसाठी ओळखला जातो. इजिप्तमध्ये हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या अनेक वास्तू आहेत. यात गिझाचे पिरॅमीड, देवदेवतांची हजारो वर्षांपूर्वीची मंदिर, थडगी, ममीज् असा मोठा एतिहासिक खजिना या देशात आहे.

नुकत्याच एका संशोधनात इजिप्तमध्ये एका पुरातन बिअर फॅक्टरीच्या अवशेषांचा शोध लागला आहे. ही बिअर फॅक्टरी 5 हजार वर्ष जुनी असल्याचा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. एबिडोस इथल्या दफनभूमीत इजिप्त आणि अमेरिकेच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खननाचं काम हाती घेतलं आहे. या दफनभूमीत उत्खनन करत असताना काही पुरातन अवशेष हाती लागले असल्याची माहिती इजिप्तच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. उत्खननात सापडलेल्या बिअर फॅक्टरीचा फोटो इजिप्त सरकारनं शेअर करत ही माहिती दिली आहे.

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

Facebook-इजिप्त पर्यटन आणि पुरातत्व विभाग)

एबिडोस इथल्या उत्खननादरम्यान ४0 मोठी मातीची भांडी सापडली आहेत. दोन रांगांमध्ये ही मातीची भांडी रचून ठेवल्याचं आढळून आलं. इजिप्त आणि अमेरिकेतील पुरातत्व शास्त्रज्ञांचं पथक एबिडोसच्या दफनभूमीत उत्खनन करत असताना मातीच्या भांड्यांचे अवशेष त्यांच्या हाती लागले.

इजिप्तच्या पुरातत्व खात्याचे सरचिटणीस मुस्तफा वजीर यांनी या उत्खननासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. मातीचे रांजण असलेली अशी आठ कोठारं उत्खननात सापडली आहेत. बिअरच्या निर्मितीसाठी धान्य आणि पाणी मोठ्या भांड्यांमध्ये साठवून ठेवणं गरजेचं असतं. यासाठीच ही मातीची भांडी वापरली जात असावी असं मत आभ्यासकांनी मांडलंय. 5 हजार वर्षांपूर्वी एबिडोसच्या या भागात राजा नारमेर याचं राज्य होतं आणि याच काळातील हे अवशेष असल्याचं वजीर यांनी नमूद केलं आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

दफनभूमीत बिअर फॅक्टरी !

इजिप्तमधील एबिडोसमध्ये स्मशानभूमीत बिअर फॅक्टरीचे अवषेश सापडल्यानं आश्र्चर्य व्यक्त केलं जातं आहे. हे अवशेष स्मशानभूमीत सापडण्यामागची कारणमीमांसा आभ्यासकांनी केली आहे. प्राचीन काळात इजिप्तमधील लोक पुर्नजन्मात विश्वास ठेवत होते. या काळात राजघराण्यातील सदस्यांचे अत्यसंस्कार मोठ्या थाटामाटात पार पडत असल्याचे अनेक पुरावे इजिप्तच्या इतिहासात आढळतात. अत्यंसंस्काराच्या राजेशाही सोहळ्यात मद्यपानाची सोय या बिअर फॅक्टरीतून होत असावी असं या उत्खननातील आभ्यासक डॉ. मॅथ्यू अॅडम्स यांनी सांगितलं आहे. या उत्खननात धान्य साठवणूकीच्या भांड्यांसोबतच यज्ञसंस्कारांच्या साहित्याचे अवशेषदेखील सापडले आहेत.

Facebook-इजिप्त पर्यटन आणि पुरातत्व विभाग)

19 व्या शतकात ब्रिटनच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी प्राचीन काळात या प्रकारच्या बिअर फॅक्टरी अस्तित्वात असल्याचा उल्लेख केला होता. मात्र या फॅक्टरी नेमक्या कुठे आहेत याचा शोध लावणं त्यांना शक्य झालं नव्हतं. अथक प्रयत्नांनंतर अमेरिका आणि इजिप्शियन पुरातत्व शास्त्रज्ञांच्या पथकाला एबिडोसमधील बिअरची कोठारं शोधण्यात मोठं यश हाती आलंय.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित