“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना कुणाची हाच प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर केला असला, तरी राजकीय आखाड्यातही पक्षावरील मालकी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटा आमनेसामने आले आहेत. याचाच भाग म्हणून दोन्ही गटांनी बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेवर दावा केलाय. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला. आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा ट्रेलर लाँच केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे टीझर ट्वीट करण्यात आलं आहे. हे ट्वीट करताना म्हटलं आहे, “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे.

दे गटाने आपल्या दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, तसेच शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ या प्रतिमांचा वापर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ,’ असा मजकूर लिहित आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे.

हे वाचले का?  Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ, महायुतीपुढची नेमकी आव्हानं काय?