जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले.
जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. भारतीय सुरक्षा दलांनी मंगळवारी (२७ सप्टेंबर) कुलगाममधील अहवाटू या गावात ही कारवाई केली. मोहम्मद शफी गनी (बटपोरा, कुलगाम) आणि मोहम्मद आसिफ वानी उर्फ यावर (तकिया, कुलगाम) अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.
सुरक्षा दलांना अहवाटू गावात काही दहशतवादी थांबल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार भारतीय सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. सुरक्षा दलांनी नाकेबंदी केल्यानंतर एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. यात दोन्ही दहशतवादी मारले गेले.Loaded: 1.18%Fullscreen
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे परिसरातील गॅल गोडाऊनला आग लागल्याची घटनाही घडली. त्यामुळे या भागात अनेक स्फोट झाले. या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्यानंतर जखमी जवानाला उपचारासाठी अवंतीपुरा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती सुरक्षा दलांनी दिली.
दहशतवाद्यांकडून दोन एके मालिकेतील रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.