जसा देश तशा अटी; नित्यानंदच्या ‘कैलासा’ देशाची दारं पर्यटकांसाठी खुली पण…

फरार स्वयंघोषित धर्मगुरूने बेटावर वसवलं हिंदूराष्ट्र

दहा वर्षांपूर्वी सेक्सटेप प्रकरणामध्ये अडकलेला स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद याने देशातून पलायन करून एका बेटावर नवा देश वसवल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी त्याने एक बेट विकत घेत त्याने त्या बेटाला ‘कैलासा’ असे नाव दिले. या बेटाला हिंदुंचा देश घोषित करत त्याने काही महिन्यांपूर्वी या बेटावर ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या बेटाच्या नावाने एक इ-मेल तयार करण्यात आला असून या इ-मेलच्या माध्यमातून त्या बेटावरील व्हिसा मिळवता येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नित्यानंदने वसवलेलं कैलासा बेट जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण विविध माहितीच्या आधारे ऑस्ट्रेलियाच्या जवळपास कुठेतरी हे बेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाहून कैलासा बेटावर जाण्यासाठी नित्यानंद याने ‘गरूडा’ नावाची चार्टर्ड फ्लाईट सर्व्हिसही सुरू केल्याची चर्चा आहे. नित्यानंदने सांगितल्याप्रमाणे कैलासा बेटावर कोणत्याही पर्यटकाला तीन दिवसांहून अधिक काळ वास्तव्य करता येणार नाही. या तीन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान या बेटावरील ‘परम शिवा’ नावाच्या जागी पर्यटकांना भेट देता येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता इ-मेलच्या माध्यमातून या बेटरूपी देशावर व्हिसा मिळवण्याची सुविधाही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

रिझर्व्ह बँक ऑफ कैलासाचं नवं चलन (फोटो- श्रीकैलासा वेबसाईट)

कोण आहे नित्यानंद?

नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असं आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. तो स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. वर्षभरापूर्वी गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन