जागतिक आरोग्य संघटनेने मानले भारताच्या आरोग्यमंत्र्यांचे आभार

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी आपल्या ट्विटमधून आभार मानले आहेत.

जगभरात पसरलेल्या करोना विषाणूविरुद्ध सर्वच देशांनी कंबर कसली आहे. सर्वच देशांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. तर लस निर्यातीतला भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. भारताने लसनिर्मिती आणि निर्यातीमध्ये केलेल्या प्रगतीबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक करत देशाच्या आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांचे आभार. ऑक्टोबरमध्ये भारत कोव्हॅक्सला महत्त्वपूर्ण कोविड लस शिपमेंट पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केल्याबद्दल त्यांचे आभार. वर्षाच्या अखेरीस सर्व देशांमध्ये ४०% लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याच्या लक्ष्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

गेल्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले होते. करोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे त्यांनी कौतुक केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले होते की, “डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने करोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष करोना डोसपासून ७५० दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.”

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”