जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

नाशिक शहर जिल्हा काँग्रेस तसेच सेवादलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

नवी दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा, विविध संघटनांचा सहभाग   

नाशिक : शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, वाढीव वीज देयक यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरूवारी जिल्ह्यात  सामाजिक संघटना, शेतकरी, कामगार संघटना, राजकीय पक्ष एकत्र आले. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला. विविध संघटना एकाच वेळी रस्त्यावर उतरल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली.

नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांशी तत्काळ चर्चा करत तीनही कृषी विधेयके  रद्द करा, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, अतिरीक्त वीज देयके  माफ करून शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा देण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. हंसराज वडघुले, नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टाळेबंदीच्या काळात मार्च ते जून या कालावधीत आलेले वीज देयक माफ करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्रीय मंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांविषयी के लेल्या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक: स्वस्त धान्य पुरवठ्यास तांत्रिक बिघाडाचा फटका

नाशिक शहर जिल्हा काँग्रेस तसेच सेवादलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत शेतीचा विकास या नावाखाली केंद्र सरकारकडून लादण्यात आलेल्या कायद्यांना विरोध करण्यात आला. यावेळी डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर,  हेमलता पाटील आदी उपस्थित होते. माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रत्येक तहसील कार्यालय तसेच चांदवड बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात आली. आयकर भवन येथे कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी ढोलकीवर थाप देत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न के ला. बाजार समितीसमोर कृषी कायद्याची होळी करण्यात आली.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

शेतकरी आणि कामगार यांच्या प्रशद्ब्राावर विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. यावेळी आंदोलनकत्र्यांना मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतर या नियमांचा विसर पडला. आंदोलकांनी एकाच वेळी गर्दी के ल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सोडविणे आणि आंदोलनकत्र्यांवर नियंत्रण ठेवणे ही दुहेरी जबाबदारी पोलिसांना सांभाळावी लागली. सुरगाणा येथे माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा आणि भारताचा लोकशाही युवा मंचच्या वतीनेआंदोलन करण्यात आले.  खावटीच्या जाचक अटी रद्द करा, शेतकऱ्यांवरील हल्ले थांबवा, पाणी टंचाईवर उपाययोजना करा, रोजगार हमी योजनेची कामे त्वरीत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जागरण

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सक्रि य पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरूवारी सायंकाळी सात ते शुक्र वारी सकाळी सहा या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर करण्यात येत आहे. जिल्हा परिसरातून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी कार्यालयासमोर थंडी गारठा सहन करत केंद्र सरकारचा निषेध के ला.  शुक्रवारी आढावा घेत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर