मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; १३ विद्यार्थांना १०० गुण
राष्ट्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी – तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) या परीक्षेत राज्यातील अथर्व तांबट आणि गार्गी बक्षी यांनी १०० गुण मिळवले आहेत. गार्गी बक्षीने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला असून, देशभरातील १३ विद्यार्थ्यांना शंभर गुण मिळाले आहेत.
एनटीएने बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या पेपर एकची परीक्षा १६ ते १८ मार्च दरम्यान देशभरातील ३३४ केंद्रांवर घेतली होती. या परीक्षेसाठी ६ लाख १९ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी के ली होती, तर परदेशातील १२ केंद्रांवर परीक्षा झाली. एकू ण सहा सत्रांमध्ये आणि १३ भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.
महाराष्ट्रातील अथर्व तांबट आणि गार्गी बक्षी यांच्यासह तेलंगणाचा बन्नारू रोहित कु मार रेड्डी, जॉयसुला वेंकटा आदित्य, पश्चिम बंगालचा प्रतिन मोंडल, दिल्लीच्या सिद्धार्थ कालरा, काव्या चोप्रा, बिहारचा कु मार सत्यदर्शी, राजस्थान येथील मृदुल अगरवाल, झेनिथ मल्होत्रा, रोहित अगरवाल, तामिळनाडूचा अश्विन अब्राहम, तेलंगणाचा मधुर रेड्डी यांना शंभर गुण मिळाले. मुलींमध्ये राज्यातील गार्गी बक्षी, मुलांमध्ये झेनिथ मल्होत्रा यांनी पहिला क्रमांक पटकावला.
गार्गीचा यशप्रवास…
गार्गीने भौतिकशास्त्र या अवघड विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केले. गार्गीचे शालेय शिक्षण येथील सिम्बॉयसिस शाळेत झाले. ती सध्या दादर येथील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकत आहे. १० वीच्या परीक्षेत तिने ९७ टक्के गुण संपादन केले होते. ११ वीचे शिक्षण घेतानाच तिने ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेतही शिष्यवृत्ती प्राप्त केली. गार्गी नाशिक येथील दंतरोगतज्ज्ञ मकरंद आणि अश्विनी बक्षी या दाम्पत्याची कन्या आहे.
क्रमवारी मे महिन्यानंतर…
जेईई मुख्य परीक्षेची फेब्रुवारी आणि मार्च अशी दोन सत्रे झाली आहेत. आता एप्रिल आणि मेमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर चारही परीक्षांच्या निकालानंतर क्रमवारी जाहीर करण्यात येईल.
नवा इतिहास…
या परीक्षेच्या इतिहासात आजपर्यंत एकही विद्यार्थिनी देशात पहिली आलेली नव्हती. यंदा राज्यातील गार्गी आणि दल्ली येथील काव्या चोप्रा दोन्ही मुलींनी इतिहास घडविला.
मला संगणक विज्ञान या विषयात कारकीर्द करण्याची इच्छा आहे. शालेय जीवनात संगीत आणि कथ्थक नृत्याचेही शिक्षण घेतले. मला वाचनाचीही आवड आहे. या परीक्षेसाठी विशिष्ट तास अभ्यास करायचा, असे काही ठरविलेले नव्हते. दररोज सात ते आठ तास अभ्यास केला. १० वी, १२ वीच्या अर्थात मंडळाच्या परीक्षेत विषयानुरूप उत्तरे द्यावी लागतात. या परीक्षेची पद्धत वेगळी आहे. – गार्गी बक्षी