झालेला प्रकार दुर्दैवी, पण त्यावर राजकारण नको; अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आवाहन

श्री सदस्यांचा मृत्यू होणे हे माझ्यासाठी क्लेशदायक आहे. कारण ही माझ्या कुटुंबातील सदस्यांवर कोसळलेली आपत्ती आहे.

अलिबाग: श्री सदस्यांचा मृत्यू होणे हे माझ्यासाठी क्लेशदायक आहे. कारण ही माझ्या कुटुंबातील सदस्यांवर कोसळलेली आपत्ती आहे. झालेला प्रकार दुर्दैवी आहेच पण त्यावरून कोणी राजकारण करू नका, असे आवाहन महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

 पुरस्कार सोहळय़ावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला. त्यातील काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. माझे दु:ख शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृतांना सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी  दिली आहे. झालेला प्रकार दुर्दैवी असून त्यावरून कोणी राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना केले आहे.

हे वाचले का?  Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

श्री सदस्यांवर शोककळा..

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळय़ादरम्यान ११ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेनंतर श्री समर्थ परिवारावर शोककळा पसरली आहे. रेवदंडा येथील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरासमोर काढण्यात आलेल्या रांगोळय़ा आणि फुलांचे आरास हटविण्यात आले आहेत.

धर्माधिकारी यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त

श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर  समाजमाध्यमांवर निरनिराळय़ा प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. याची गंभीर दखल रायगड पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरासमोरील बंदोबस्त वाढविला आहे. सोमवारी सकाळपासूनच पोलिसांचे पथक आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले आहे.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा