टोक्यो ऑलिम्पिकचा खर्च वाढता वाढे!

ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षांने लांबणीवर टाकण्यात आल्याने संयोजकांनी खर्चाच्या नावावर आणखी रकमेची मागणी केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकच्या खर्चासाठी देशांतर्गत पुरस्कर्त्यांनी ३.३ अब्ज डॉलरची रक्कम उभी केली असली तरी हा खर्च वाढत वाढतच चालला आहे. गेल्या ऑलिम्पिकपेक्षा हा खर्च दुप्पट असला तरी त्यात आणखी रकमेची भर पडणार आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षांने लांबणीवर टाकण्यात आल्याने संयोजकांनी खर्चाच्या नावावर आणखी रकमेची मागणी केली आहे. जपानमधील उद्योजकांना करोनाचा मोठा फटका बसला असून चाहत्यांच्या कमतरतेमुळे ते ऑलिम्पिकसाठी पुन्हा गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध ठिकाणी भेटी देणे तसेच अन्य गोष्टींवर खर्च करण्याकरिता नव्या नियमानुसार निर्बंध आले आहेत.

हे वाचले का?  Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

‘‘आमच्या पुरस्कर्त्यांकडून आम्ही आणखीन प्रायोजकत्वासंदर्भात मागणी करणार आहोत,’’ असे संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी स्पष्ट केले होते.

ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर पडल्याने अतिरिक्त २.८ अब्ज डॉलरचा भार संयोजकांना सहन करावा लागणार आहे. पुरस्कर्त्यांनी अतिरिक्त प्रायोजकत्वासाठी सहमती दर्शवली असली तरी ते किती रकमेचे योगदान देणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांचा भक्कम पाठिंबा असलेल्या ऑलिम्पिकसाठी देशांतर्गत ७० पुरस्कर्त्यांपैकी एकानेही मदत करण्यास नकार दर्शवलेला नाही.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा