शहरातील गटारी, रस्ते स्वच्छता आणि जंतुनाशक फवारणीसाठीचे काम पूर्वी खासगी ठेकेदार आणि महापालिके च्या कायम कर्मचाऱ्यांकरवी केले जात होते.
प्रल्हाद बोरसे
मालेगाव : शहरातील स्वच्छतेच्या कामासाठी थेट ठेके दार नियुक्त करावा की मजूर पुरवण्यासाठी ठेका द्यावा, या संदर्भात निर्माण झालेला वाद उच्च न्यायालयात गेल्याने महापालितर्फे सुरू झालेली ठेके दार नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे शहरातील स्वच्छतेचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे स्वच्छतेचे काम करताना दमछाक सहन करावी लागत असतानाच अस्वच्छतेमुळे बेजार झालेल्या नागरिकांचा रोषही पत्करावा लागत आहे.
शहरातील गटारी, रस्ते स्वच्छता आणि जंतुनाशक फवारणीसाठीचे काम पूर्वी खासगी ठेकेदार आणि महापालिके च्या कायम कर्मचाऱ्यांकरवी केले जात होते. या खासगी ठेक्याची मुदत संपल्यानंतर ६०० कायम कर्मचाऱ्यांच्या जोडीला मानधनावरील ४०० नियुक्त कर्मचाऱ्यांकडून हे काम रेटण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहिला. परंतु मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण करण्यात येणाऱ्या अडचणी तसेच आस्थापनाविषयक समस्यांना तोंड देण्याऐवजी स्वच्छतेच्या कामांसाठी मजूर पुरविणाऱ्या ठेके दाराची नियुक्ती अधिक श्रेयस्कर वाटल्याने मध्यंतरी पालिका प्रशासनाने त्यासाठीच्या निविदा मागवल्या होत्या.
मात्र प्राप्त चारही निविदा अपात्र ठरल्याने ठेके दार नियुक्तीची ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. दरम्यानच्या काळात मजूर पुरवणाऱ्या ठेके दाराची नियुक्ती करण्यापेक्षा थेट ठेके दाराकडूनच हे काम करून घेणे आर्थिकदृष्ट्या महापालिके च्या अधिक फायद्याचे असल्याचे गणित मांडत महापालिका सभागृहाने मजूर पुरविण्यासाठी ठेके दार नियुक्तीला विरोध दर्शविला. त्याऐवजी थेट ठेके दार नियुक्त करून त्याच्यामार्फत हे काम करून घ्यावे, असा ठरावही सभागृहाने मंजूर के ला.
महापालिके च्या या धोरणात्मक बदलाच्या निर्णयानुसार प्रशासनाने स्वच्छतेसाठी थेट ठेके दार नियुक्त करण्याची प्रक्रिया नव्याने सुरू के ली. त्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या. मात्र ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच आधीच्या मजूर पुरविण्याचा ठेका घेण्यासाठीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोघा इच्छुक ठेके दारांनी महापालिके च्या एकूणच कृतीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानुसार न्यायालयाने स्थगिती दिल्याने महापालिके ला नव्याने हाती घेतलेल्या ठेके दार नियुक्तीची प्रक्रिया तूर्त थांबवावी लागली आहे. सद्यस्थितीत मानधनावरील कर्मचाऱ्यांचीदेखील सेवा संपुष्टात आल्याने महापालिके तील के वळ ६०० कायम कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे हे काम पार पाडण्याची कसरत पालिके ला करावी लागत आहे. अशा अपुऱ्या मनुष्यबळाच्या स्थितीमुळे हे काम नीट होत नसल्याने शहरात जागोजागी तुडुंब भरलेल्या गटारी, कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता निर्माण झाल्याचे दृश्य दिसत आहे. तसेच जंतुनाशक फवारणीबद्दलही सर्वत्र आनंदीआनंद असून त्यामुळे शहरात रोगराई निर्माण होण्याची भीती व्यक्त के ली जात आहे.
शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे लोकांमध्ये महापालिके च्या एकूणच कारभाराबद्दल असंतोष निर्माण होत असून त्याबद्दल खुद्द कृषिमंत्री दादा भुसे यांनाही महापालिके ला निर्वाणीचा इशारा द्यावा लागला आहे.
शहर स्वच्छतेला प्राधान्य आणि महापालिके चे आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवत महापालिके च्या वतीने स्वच्छतेच्या कामांसाठी थेट ठेके दार नियुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील वाद न्यायालयात गेल्यामुळे ही प्रक्रिया रखडली असली तरी महापालिके ची बाजू कशी योग्य आहे, हे न्यायालयात मांडल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल याची खात्री आहे.
– त्र्यंबक कासार (आयुक्त, मालेगाव महानगरपालिका)