तयार मालाच्या निर्यातीवर भर; कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

देशातील कच्च्या मालाची निर्यात होणे आपल्याला मान्य नाही, कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार मालाचीच निर्यात व्हायला हवी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
पीटीआयभुवनेश्वर

देशातील कच्च्या मालाची निर्यात होणे आपल्याला मान्य नाही, कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार मालाचीच निर्यात व्हायला हवी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. कच्च्या मालाचे भारतातच मूल्यवर्धन व्हायला हवे असे ते म्हणाले. भुवनेश्वरच्या जनता मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कर्ष ओडिशा, मेक इन ओडिशा कॉनक्लेव्ह’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी बोलत होते.

हे वाचले का?  PM Modi-Omar Abdullah : PM मोदी आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यातील मैत्री वाढली? झेड-मोढ बोगद्याच्या उद्घाटनावेळी नेमकं काय घडलं?

पूर्व भारत देशाच्या प्रगतीचे इंजिन असून ओडिशा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळेस स्पष्ट केले. ‘‘देशाच्या या भागात मोठ्या प्रमाणात खनिजांचे उत्खनन केले जाते आणि ते इतर देशांना निर्यात केले जाते. तिथे त्याचे मूल्यवर्धन होते आणि भारताला तयार माल पाठवला जातो. मला हे मान्य नाही,’’ असे ते म्हणाले. बदलत्या जगामध्ये जागतिक पुरवठा साखळीसमोरील आव्हाने ओळखण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

हे वाचले का?  Stampede Breaks Out at Maha Kumbh : मौनी अमावस्येला महाकुंभ येथे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता; आजचे शाही स्नान रद्द!

Also Read

कच्च्या मालाची निर्यात करून देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण व्यवस्थाच बदलत आहोत आणि एका नव्या दृष्टिकोनाने काम करत आहोत. जागतिक चढउतारांचा परिणाम कमी करण्यासाठी भारतातच मजबूत पुरवठा व मूल्य साखळी निर्माण करायला हवी. ही जबाबदारी सरकार आणि उद्याोग या दोघांचीही आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हे वाचले का?  इस्रोकडून अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी; अमेरिका, रशिया, चीननंतर भारताचा यशस्वी प्रयोग