तीन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर ;त्रिपुरा, मेघालय, नागालँडचा समावेश; २ मार्च रोजी मतमोजणी

ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली.

नवी दिल्ली : ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी तर, मेघालय व नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होईल.तीनही विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये वेगवेगळय़ा तारखांना संपणार आहे. त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे, तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेत आहे. ईशान्येकडील एकमेव पक्ष ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीची मेघालयमध्ये सत्ता आहे.

हे वाचले का?  Patanjali Ayurved : बाबा रामदेव यांच्यावरील ‘तो’ खटला अखेर संपला; पण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी संपवताना दिली तंबी!

याशिवाय, केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महम्मद फैजल यांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवल्याने या लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय, अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतील सहा विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होत असून सर्व मतदारसंघात २७ फेब्रुवारीला मतदान होईल. इतर निकालासह २ मार्च रोजी मतमोजणी होईल.