त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, २५० जादा बस सेवेत, तिसऱ्या श्रावणी सोमवारचे नियोजन

गोदाकाठासह बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर, कुशावर्त परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ही गर्दी उच्चांक गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नाशिक : श्रावणातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्व असल्याने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा करणाऱ्यांची गर्दीत भर पडणार असल्याने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २५० जादा बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा अधिकचा श्रावण आल्याने उत्तर भारतीयांसह देशाच्या इतर भागातून आलेल्या भाविकांनी अधिक मासात शिवदर्शनाला प्राधान्य दिले.

हे वाचले का?  फिरत्या पथकाची आता खाणींवर नजर, वन विभागाच्या आश्वासनानंतर ब्रम्हगिरी कृती समितीचे आंदोलन स्थगित