दहशतवादाविरोधात ब्रिक्स देश एकवटले; पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा

सुरक्षा, प्रादेशिक समस्या, कोविड -१९, हवामान बदल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा या सर्व मुद्द्यांवर ब्रिक्सची सर्वसमावेशक बैठक पार पडली.

ब्रिक्स विकसनशील देशांच्या प्राधान्यक्रमावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे तो जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज म्हणून उदयास आला आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाच देशांच्या समूहाच्या आभासी शिखर परिषदेत केले. “गेल्या दीड दशकात ब्रिक्सने खूप चांगली कामगिरी केली आहे. आज आपण जगाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत. पुढील १५ वर्षांत ब्रिक्स अधिक उत्पादनक्षम कसे होईल, याबद्दल आपण काम करायला हवं,” असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी १३ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे जैर बोल्सानारो यांच्या उपस्थितीत शिखर परिषदेने ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती योजना स्वीकारली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सुरक्षा, प्रादेशिक समस्या, कोविड -१९, हवामान बदल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा या सर्व मुद्द्यांवर ब्रिक्सची सर्वसमावेशक बैठक पार पडली.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये अफगाणिस्तानचा कोणताही संदर्भ दिला नसला तरी बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी २४ ऑगस्ट रोजी ब्रिक्स राष्ट्रांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचे सादरीकरण केले.

त्यानंतर भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भारताने सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या गटांना काहींचा पाठिंबा असल्याने देशाच्या शांतता आणि सुरक्षेला धोका आहे.”https://platform.twitter.com/embed/Tweet.html?१३ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत बहुपक्षीय प्रणालींना बळकट आणि सुधारित करण्यासाठीही पाच देशांच्या समूहाने भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.