दहावी-बारावी Offline Exam: बसण्याची व्यवस्था, परीक्षा केंद्र ते External Examiner…; असे आहेत परीक्षेचे २० नियम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितली नवीन नियमावली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत, असं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मंडळाने आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली.

दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी सोमवारी म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ रोजी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनं केली होती. मात्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचं आज मंडळाने स्पष्ट केलंय. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदाच्या परीक्षांमध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये अगदी परीक्षा केंद्रांपासून अधिक वेळ वाढवून देण्यापर्यंतचे तरतूद करण्यात आलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मंडळाकडून देण्यात आली. पाहूयात यातील काही महत्वाचे मुद्दे.

हे वाचले का?  ६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी

> बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च २०२२ दरम्यान ऑफलाइन पद्धतीने होणार.

> १४ फेब्रुवारी ते ३ मार्च तोंडी परीक्षा तसेच प्रॅक्टीकल परीक्षा होतील.

> दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान ऑफलाइनच होतील.

> २५ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा होतील.

> परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय किंवा शाळा हेच उपकेंद्र असेल अशी रचना करण्यात आलीय.

> एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे.

> करोना काळात ऑनलाईन वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झालाय ही बाब लक्षात घेऊन वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

> ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

> १० मिनीटं आधी प्रश्नपत्रिका देणार.

> ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटांचा अधिकचा कालावधी देण्यात येणार आहे.

> ७० ते १०० गुणांची परीक्षा असल्यास अर्धा तासाचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.

> दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नियम लागू असतील.

> करोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलं जाणार आहे.

> परीक्षेला विद्यार्थी झीक झॅक पद्धतीने सुरक्षित अंतर ठेऊन बसतील असे नियोजन करण्यात आले आहे.

> करोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.

> एक्सटर्नल एक्झामिनर म्हणजेच तोंडी परीक्षांसाठी बाह्य शिक्षक नसणार. एकाच विषयाचे दोन शिक्षक असतील तर तेच घेणार परीक्षा.

> एक्सटर्नल शिक्षक आला तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!

> परीक्षांचे पर्यवेक्षक हे शाळा कॉलेजमधील असतील की बाहेरील हे लवकरच ठरवलं जाईल.

> अतिरिक्त प्रमाणामध्ये फिरती पथकं नेमण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजांमध्येच केंद्र असल्याने कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलीय.

> परीक्षेसाठी लस बंधनकारक असणार नाही.